
Sharad Pawar । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. या अनपेक्षित घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात कधी काही होईल याचा अंदाज लावणे शक्य नाही. अशातच आता सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळा चर्चांना उधाण आले आहे.
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Co-operation Minister Dilip Valse Patil) यांनी दिवाळीनिमित्त शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी दिलीप वळसे पाटील हे मोतीबाग मध्ये पोहोचले आहेत. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी शरद पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट पडले यानंतर दिलीप वळसे पाटील हे अजित पवार गटात गेले आहेत.
Sharad Pawar । शरद पवारांच्या वकिलांचे अजित पवार गटावर खळबळजनक आरोप
मात्र अजित पवार गटात असून देखील दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांना फक्त दिवाळीच्या शुभेच्छा देणार का इतर राजकीय विषयावर देखील चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.