
यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जेष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dhaadhikari) यांना मिळाला. रविवारी (ता.१६) मुंबईमधील खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात १३ लोकांचा उष्माघाताने मृत्यु झाला आहे. (Heat Stroak) यामुळे राजकीय वातावरण तापले असून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. दरम्यान राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमली आहे.
‘या’ कारणामुळे गौतमी आणि उर्फीवर कारवाई करता येत नाही; रुपाली चाकणकर यांचे वक्तव्य
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका कार्यक्रमात बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा अप्पासाहेब पवार यांच्या संस्थेने आयोजित केला नव्हता. तो कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने आयोजित केला होता. मात्र या ठिकाणी निष्पाप लोकांचा मृत्यु झाला. राज्य सरकारने योग्य खबरदारी न घेतल्याने हे घडले. असे म्हणत शरद पवारांनी राज्य सरकारला सुनावले आहे.
‘या’ पद्धतीचा वापर करून किडनीमध्ये जमलेली घाण काढा बाहेर; वाचा सविस्तर
या घटनेच्या चौकशीसाठी सरकारने एका विशेष अधिकाऱ्याची समिती स्थापन केली आहे. तो अधिकारी स्वच्छ कामासाठी प्रसिद्ध असला तरी त्याला बॉसला रिपोर्ट करावा लागणार आहे. यामुळे यातून सत्य परिस्थिती पुढे येऊ शकणार नाही. म्हणून या घटनेबाबतच्या चौकशीची जबाबदारी हाय कोर्टाच्या सिटिंग न्यायाधीशांकडे सोपवली पाहिजे. यामुळे खरी वस्तुस्थिती समोर येईल. असे शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.