Sharad Pawar । शरद पवारांचं ठरलं! म्हणाले, आता कोणत्याही परिस्थितीत …

Sharad Pawar decided! Said, now in any case...

Sharad Pawar । मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) बंड करून राजकारणात आतापर्यंतचा सर्वात मोठा भूकंप घडवून आणला. त्यांनी अचानक आपल्या ८ सहकाऱ्यांनी अचानक मंत्रिपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. येणाऱ्या निवडणुकीत याचा परिणाम या पक्षाला सहन करावा लागणार आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांचा या बंडामागे हात असल्याचे बोलले जात आहे. (Latest Marathi News)

Manipur Violence । “आता आमच्यावर बलात्कार होऊ देणार नाही”; मणिपूरच्या महिला हातात मशाल घेऊन आक्रमक

यावर अखेर शरद पवार यांनी मौन सोडत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काल मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला काँग्रेस (Congres) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बोलताना ते म्हणाले की, “आपल्याला भाजपविरोधात लढायचे आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत आपण एकमेकांची साथ सोडायची नाही. देशातील विरोधकांची आघाडी ‘INDIA’ च्या बैठकीचे चांगले नियोजन करा,” अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.

भारीच की राव! टोमॅटो नाही तर आलं लावून शेतकरी बनला कोट्यवधी रुपयांचा मालक

दरम्यान, अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शरद पवारांनी थेटपणे त्यांच्यावर टीका केली नाही. पक्ष कोणत्या गटाचा यावरही त्यांनी कायदेशीर हालचाली केल्या नाहीत. शरद पवार यांच्या प्रत्येक कृतीमागे राजकीय अर्थ दडला असतो, असा राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवारांची काय भूमिका असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Leopard Attack : धक्कादायक घटना! पिकाला पाणी देण्यासाठी जात असताना तरुणावर केला बिबट्याने जीवघेणा हल्ला

हे ही पहा

Spread the love