Ajit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) फायरब्रॅन्ड नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या ८ सहकारी नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. विरोधी पक्षाच्या बाकावर बसलेले अजित पवार अचानक सत्तेत सहभागी झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पक्षांमध्ये आता अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट पडले आहे त्यामुळे कार्यकर्त्यांना कोणत्या गटाची साथ द्यावी, असा प्रश्न पडत आहे. (Latest Marathi News)
Tomato Price। टॉमॅटो महाग वाटत असतील तर खाऊ नका, भाजप मंत्र्याच्या अजब सल्ल्याने खळबळ
नुकतीच अजित पवार यांनी एका माध्यमाला मुलाखत दिली आहे. त्यात त्यांनी आपल्याला शरद पवार यांनी राजकारण शिकवले नसल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. भाषण कसे करायचे हे देखील आम्हाला कोणी सांगितले नाही, परंतु आम्ही शरद पवार यांना पाहून राजकारण शिकलो. वेगवेगळे राजकारणी लोक कसे बोलतात, सभा कशी जिंकतात, भाषणात काय मुद्दे मांडतात हे आम्ही पाहत होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
ITBP Recruitment । दहावी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, महिन्याला मिळणार 69 हजार पगार
पुढे बोलताना ते म्हणाले की, “लहान असताना आम्ही आमच्या सर्व काकांना घाबरायचो. त्यांच्याजवळ कधीच गेलो नाही. कारण सर्वांची आदरयुक्त भीती आमच्या मनात होती. त्यामुळे आम्ही काकांपासून जितकं लांब राहता येईल तितकं लांब राहत होतो. मी निर्व्यसनी आहे, कारण आमच्या घरात चांगले संस्कार झाले आहेत. कुणीही दुपारपर्यंत झोपायचे नाही, सकाळी लवकर उठायचे. हे आमच्या लहानपणापासून मनावर बिंबवले गेले, त्यामुळे मी आजही लवकर उठतो”, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
Milk Price | राज्य सरकारची दूध दरवाढ खोटी! दरवाढ करूनही मिळतोय ‘इतकाच’ दर
हे ही पहा