Sharad Pawar । ब्रेकिंग! माढ्याचा तिढा सुटला?; ‘तो’ बडा नेता शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sharad Pawar

Sharad Pawar । निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक-2024 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या घोषणेनुसार 19 एप्रिलपासून 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यानंतर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सगळीकडे याबाबत असलेली धामधूम आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये पेच असल्याचा पाहायला मिळत आहे.

topers ad

Crime । ‘माझ्या नवऱ्याला कोणी मारलं तर मी त्याला ५० हजार रुपये देईन’ पत्नीने ठेवलं WhatsApp स्टेटस…

दरम्यान आता महाविकास आघाडीतही काही जागांवर तिढा असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता हा तिढा सुटल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण एका बड्या नेत्यानं राष्ट्रवादी शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता माढ्याचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

Viral News । IAS अधिकारी महिलेचा पती हॉटेलमध्ये परदेशी महिलेसोबत करत होता नको ते कृत्य, पोलिसांनी धाड टाकताच..

यावेळी शरद पवार यांनी निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना प्रविण गायकवाडांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 3 तारखेला माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Praniti Shinde । प्रणिती शिंदेंचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर

Spread the love