
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा ( Ajaykumar Mishra) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीच्या फळीतील नेते अजित पवार ( Ajit Pawar) यांच्यावर गंभीर टीका केली आहे. ‘अजित पवारांनी दबावतंत्र वापरून विरोधी पक्षनेते पद मिळवले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी देखील ते वाटाघाटी करणारे आहेत. यामुळे त्यांच्या काकांचाच त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही’ असे म्हणत मिश्रा यांनी थेट शरद पवार व अजित पवार यांच्या वर्मावर बोट ठेवले आहे.
नाशिकमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघात! चालत्या बसने घेतला पेट
साताऱ्यात कराड येथे त्यांनी अजयकुमार मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर व राहून गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला आम्ही गांभीर्याने घेत नाही कारण, त्यांच्याच पक्षातील लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. असे म्हणत त्यांनी काँग्रेसचे वाभाडे काढले आहेत.
‘या’ कारणामुळे मी राजकारणापासून लांबच राहिलो; रितेश देशमुखने केला मोठा खुलासा
दरम्यान भारतीय जनता पक्ष ( BJP) महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदारसंघात जिंकण्याचे ध्येय ठेऊन काम करत आहे. तसेच सातारा मतदारसंघात अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली विश्वासपूर्ण संघटन झाले आहे. अशी माहिती देखीक केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांनी यावेळी दिली.
Gautami Patil: गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी घेते ‘इतकं’ मानधन!