
पुण्याचे माजी महापौर आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच शरद पवार भावुक झाले आहेत.
सर्वात मोठी बातमी! खासदार गिरीश बापट यांचे निधन
शरद पवार (Sharad Pawar) यांनी ट्विट करत लिहिले की, “पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला.” त्याचबरोबर पुढे त्यांनी लिहिले, पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. #GirishBapat pic.twitter.com/qkATwWyx46
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 29, 2023
मोठी बातमी! खासदार गिरीश बापट यांची प्रकृती खालावली
दरम्यान, त्यांच्यावर अंत्यविधी संध्याकाळी 7 वाजता वैकुंठ स्मशान भूमीत होणार आहे. गिरीश बापट राजकारणामध्ये खूप सक्रिय होते. त्यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याच्या भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या आहेत.
भर कार्यक्रमात गौतमीला टक्कर देणारा पवन नेमका आहे तरी कोण? पाहा त्याचे व्हायरल Video