अनेक काळापासून रखडलेल्या लवासा प्रकरणी शरद कुटुंबियांना लवलरच धक्का बसणार आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्यात आली असून यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कुटुंबियांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात यावेत. अशी मागणी करण्यात आली आहे. नानासाहेब जाधव (Nanasaheb Jadhav) यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे.
मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे विधान; म्हणाले, “आरक्षण-आरक्षण बस झालं आता…”
जाधव यांनी दाखल केलेल्या या याचिकेमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुबियांचे अतिशय निकटवर्तीय अजित गुलाबचंद यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे.
पोलिसांसमोर मुलाने गायले गाणे आणि पुढे घडलं असं की…”, पाहा VIDEO
पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित लवासा हिलस्टेशन प्रकल्पाबाबत (Lavasa Hillstation project) याचिका कर्त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे. मात्र, तरीही त्यांनी तक्रार देण्यात बराच उशीर केला असल्याचे निरीक्षण तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी नोंदवले होते. यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 26 फेब्रुवारी 2022 रोजी हायकोर्टाने लवासा प्रकल्पाविरोधातील मूळ याचिका निकाली काढली होती.
पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही! राज ठाकरेंचे मोठे विधान…