Site icon e लोकहित | Marathi News

अजित पवारांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर शरद पवार शेवटी बोललेच; म्हणाले…

Sharad Pawar finally spoke on Ajit Pawar's 'that' controversial statement; said...

यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याने गाजले होते. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक आहेत. असे ते म्हणाले होते. यापार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे नेते आक्रमक झाले असून अजित पवारांविरोधात राज्यभर आंदोलन देखील झाले. ज्यामध्ये संभाजी महाराज स्वराज्यरक्षक व धर्मवीर आहेत, अशी भूमिका भाजपकडून मांडण्यात आली आहे.

“राज्यपाल बनणं म्हणजे दु:खच दु:ख”; राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली खंत

दरम्यान राष्ट्रवादीचे ( NCP) सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत या विषयावर आपले मत मांडले आहे. यावेळी ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणण्यात काहीही चुकीचे नाही. त्यांनी स्वराज्यावर आलेले अनेक हल्ले परतवून लावले आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनीही आपल्या भूमिकेवर ठाम राहताना संभाजी महाराज स्वराज्यरक्षक असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

राजकारणासोबत शेतीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माहीर; ‘ही’ माहिती वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

या पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवार यांनी राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. कुस्तीला लागलेलं डोपिंगचे ग्रहण, सीमाप्रश्न, राज्यपालांची बेताल वक्तव्ये, शिवसेनेवर होत असलेली टीका, राहुल गांधी, भारत जोडो यात्रा या मुद्द्यांवर त्यांनी आपले मत मांडले आहे. तसेच सीमाप्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असेल त्यावेळी राज्याने आपली बाजू योग्य पध्दतीने मांडावी, असे देखील शरद पवार म्हणाले आहेत.

“फक्त गुजरातला प्राधान्य देणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही” – राज ठाकरे

Spread the love
Exit mobile version