Politics News । राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी, शरद पवारांनी दिला भाजपला धक्का

Politics News

Politics News । महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपल्या जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. महायुतीतील अनेक नाराज नेते महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करत आहेत. महायुतीला याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो. अशातच आता राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपला (BJP) सर्वात मोठा धक्का दिला आहे.

Viral News । उडत्या विमानात जोडप्याने खुलेआम सुरू केला रोमान्स, पाहून प्रवासी झाले थक्क; फोटोही झाले व्हायरल

भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे १० एप्रिल रोजी राजीनामा पत्र पाठवले होते. नुकतीच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवार गटाकडून मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती आहे.

Maharashtra Lok Sabha Elections । शरद पवारांबद्दल छगन भुजबळांचा सर्वात मोठा दावा, म्हणाले…

दरम्यान, भाजपने माढा लोकसभा मतदार संघातून रणजीत सिंह निंबाळकर (Ranjit Singh Nimbalkar) यांना उमदेवारी दिली आहे. पक्षाच्या या निर्णयामुळे धैर्यशील मोहिते पाटील नाराज होते. मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी अकलूजमध्ये बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहिते पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ते भाजपमधून बाहेर पडणार असल्याचे देखील स्पष्ट झाले. (Dhairyashil Mohite Patil vs Ranjit Singh Nimbalkar)

Devendra Fadnavis । काँग्रेसबद्दल फडणवीसांचं धक्कादायक वक्तव्य; म्हणाले, “त्यांना शून्यावर…”

Spread the love