
आज जागतिक महिला दिनानिमित्त वेगेवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज राज्य महिला आयोगाच्या वतीने ‘जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तत्वाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
सुभाष दरेकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
यावेळी शरद पवार यांनी मातोश्री शारदाबाई पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, आईने तिसऱ्या दिवशी सभागृहात नेल्याने मला सर्व सभागृह पाहण्याची संधी मिळाली, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
शरद पवार म्हणाले, “माझ्या मातोश्री स्वातंत्र्य चळवळीत होत्या. त्या कधीच कोणत्या लोकल बोर्डाच्या बैठकीला उशीरा जात नव्हत्या किंवा गैरहजर देखील राहत नव्हत्या” असं देखील यावेळी शरद पवार म्हणाले आहेत.
अजित पवारांना मोठा धक्का; अहमदनगर जिल्हा सहकारी बँक भाजपच्या ताब्यात