Maharashtra Politics । राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसापासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. काल केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर केला. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाचा पराभव झाला असून अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह देण्यात आले आहे. (Latest marathi news)
यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या गटाला आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला तीन नावांचा आणि चिन्हांचा प्रस्ताव पाठवण्याचा आदेश दिला होता. आदेशानुसार निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने तीन नावांचा प्रस्ताव दिला आहे.
Sambhajiraje Chhatrapati । मोठी बातमी! 5 दिवसांपासून संभाजीराजे नॉट रिचेबल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार गटाकडून दिलेल्या तीन नावांपैकी पहिलं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरद पवार, दुसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – एस असं आहे. जरी निवडणूक आयोगाला तीन नावांचा प्रस्ताव पाठवला असला तरी त्यांच्याकडून तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवला नाही. कारण राज्यसभेच्या निवडणुकीला चिन्हाचा वापर केला जात नाही. त्यामुळे शरद पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी चिन्हाचा फोटो पाठवला नाही.