
Sharad Pawar group । मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागील दोन दिवसांपूर्वी आक्रमक होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जहरी कडवी टीका केली होती. यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे सगळीकडे हा विषय चर्चेत आहे. (Latest marathi news)
Ashok Chavan । अशोक चव्हाणांबाबत बोलताना भाजप खासदाराची जीभ घसरली; केले धक्कादायक विधान
मनोज जरांगे यांच्या एसआयटी चौकशीआवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या देखील शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या एसआयटी तपासावर ते म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी काल माफी मागितली. ते गरिबांसाठी लढणारे सामान्य माणूस आहेत. त्यांच्या विरोधात एसआयटी तपास करणे ही चांगली गोष्ट नाही. उप मुख्यमंत्र्यांनी असे करू नये. असं ते म्हणाले आहेत.
Rohit Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु
त्याचबरोबर एमएसपीवर देखील शरद गटाच्या आमदाराने मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा म्हणतात, “राज्य सरकारने कापूस, धान आणि सोयाबीनला एमएसपी दिलेला नाही आणि राज्यात शेतकरी आंदोलन करत आहेत. या पिकांना चांगला भाव द्यावा. असं ते म्हणाले आहेत.