Sharad Pawar group । राज्याच्या राजकारणामध्ये मागच्या काही दिवसापासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात कधी काय होईल याचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. सध्या देखील राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट (Sharad Pawar group) काँग्रेसमध्ये (Congress) विलीन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला ही माहिती मिळाली आहे. शरद पवार गटाकडून मात्र याबाबत दुजोरा देण्यात आलेला नाही. (Maharastra Politics)
Ganpat Gaikwad । गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांना न्यायलयीन कोठडी
सध्या आगामी लोकसभा निवणुकांसंदर्भात पुण्यामध्ये शरद पवारांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला रोहित पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, बाळासाहेब पाटील हे बडे नेते उपस्थित आहेत. पुण्यातील शरद पवारांच्या कार्यालयात ही बैठक सुरू आहे.
शरद पवार यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बैठक बोलवली आहे. बैठकीत राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन करण्यातबाबत चर्चा सुरु आहे, अशी माहिती आहे. शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार असल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे.
Abhishek Ghosalkar Firing । अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणात समोर आली धक्कादायक माहिती!
शरद पवार गटाचे नेते मंगलदास बांदल यांनी यावर भाष्य केलं असून पक्षाला विलीन करण्याचा निर्णय हा राष्ट्रीय पातळीवरचा आहे. वरिष्ठ नेते याबाबतचा निर्णय घेतील. मात्र अशी चर्चा पवारांनी बोलावलेल्या बेठकीत सुरु आहे, असं मंगलदास बांदल हे म्हणाले आहेत.