सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे कोणीही सांगू शकत नाही. यामध्येच आता जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी एकाच रेल्वे डब्यातून प्रवास केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
रेल्वेच्या एका डब्यामध्ये बसलेले या दोन नेत्यांचे फोटो देखील समोर आले आहेत. त्यामुळे आता उलट सुलट चर्चा होऊ लागल्या आहेत. शरद पवार हे १६ जूनच्या दिवशी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. गुरुवारी शरद पवार हे मुंबईहून रेल्वे गाडीत बसले. त्याच डब्यात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटीलही होते. त्यामुळे या दोघांच्या एकत्र प्रवासाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “आज योगायोगाने शरद पवार यांच्यासह प्रवास करण्याची संधी मिळाली. मात्र आमच्या कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही.” अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
हे ही पाहा