एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतील आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केली आणि राज्यात नवीन सरकार स्थापन केले. मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांनी “शिवसेनेचे आमदार फुटणार ही महिती उद्धव ठाकरेंना दोन, तीन वेळा दिली होती. असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. ते आज पुण्यामध्ये बोलत होते.
कमी खर्चात जास्त नफा; ‘अशी’ करा मुळ्याची शेती
अजित पवार म्हणाले, पवार साहेब यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दोन तीन वेळा सांगितले होते की आमदार फुटणार. मात्र उद्धव ठाकरे म्हणाले की माझ्या आमदारांवर मला विश्वास आहे.” मात्र आमदारांवर विश्वास ठेऊन तिथेच खरी गफलत झाली. असे अजित पवार म्हणाले आहेत.
त्याचबरोबर पुढे अजित पवार म्हणाले, “पवार साहेब यांनी तर उद्धव ठाकरे यांना माहिती दिली होती आमदार फुटणार. मात्र त्यावेळी मी देखील स्वतः उद्धवजींना सावध केलं होतं मात्र ते त्यावेळी बोलले होते की मी बोलेन एकनाथ शिंदे यांच्याशी तो आमचा पक्षांतर्गंत मामला आहे.” असं अजित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात अडकली लग्नबंधनात; पाहा PHOTO