Sharad Pawar । अमरावती : राज्यात सध्या महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) या सरकारवर निशाणा साधत आहे. विविध मुद्द्यावरून सतत या सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. महायुतीत सामील झालेले माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) मागील काही दिवसांपासून सरकारविरोधात आक्रमक झाले आहे. (Latest Marathi News)
Pune Koyata Gang । धक्कादायक! पुण्यात कोयता गँगची दहशत थांबेना, पोलिसांसमोरच केला हल्ला
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार अमरावती (Amravati) दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यात बच्चू कडू यांनी त्यांना चहासाठी निमंत्रण दिले आहे. महत्त्वाचे म्हणजे शरद पवार यांनी देखील त्यांचं निमंत्रण स्वीकारल आहे. या दौऱ्यादरम्यान महायुतीत नाराज असलेले बच्चू कडू पुन्हा महाविकास आघाडीत येणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
Petrol Diesel Rate । कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण, पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या
शरद पवार बोलताना म्हणाले की, “एखाद्या विधानसभा सदस्याने चहासाठी बोलावल्यावर जायला पाहिजे. त्यांनी माझ्याकडे चहासाठी येण्याचं निमंत्रण दिलं, ते मी स्वीकारलं आहे. परंतु, या भेटीमागे कोणत्याही प्रकारचा राजकीय हेतू नाही. बच्चू कडू महायुतीत नाराज असून ते महाविकास आघाडीत येणार असतील तर तुम्ही त्यांना घ्याल का, असा प्रश्न पत्रकारांनी शरद पवारांना विचारला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले, कशावरुन, तुमच्याकडे तशी माहिती आहे का? त्यांच्या या उत्तरावरून महाविकास आघाडीत परत येणार या चर्चांना विराम मिळाला आहे.
Jaggery Tea । सावधान! तुम्हीही साखरेऐवजी गुळाचा चहा पिताय का? तज्ञ काय म्हणतात जाणून घ्या