गेल्या काही दिवसांपासून राज्यात वारंवार धार्मिक-जातीय तणावाच्या घटना घडत आहेत. पुन्हा एकदा संगमनेर आणि कोल्हापूर येथे जातीय तिढा निर्माण होतील अशा घटना घडल्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
बापरे! उर्फी जावेदला पाहताच लोकं घाबरली अन् थेट पळायला लागली; पाहा व्हिडिओ
त्यानंतर गुरुवारी माजी खासदार निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी शरद पवार यांचे मुघल शासक औरंगजेबाचा पुनर्जन्म असे वर्णन केले. जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा शरद पवार मुस्लिमांची चिंता करू लागतात. औरंगजेबचा पुनर्जन्म झाला की काय असं मी बोललो त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? औरंगजेब पण मुस्लिम धर्माला बनवण्यासाठी जे शक्य होतं ते सगळं करायचा, हेही तसंच वागतात, असे निलेश राणे म्हणाले.
गौतमी पाटीलचा ‘तो’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले, “तू तर खूपच…”
त्याचवेळी, आई आणि वडिलांनी दिलेल्या नावामुळे शरद पवार साहेब साहेब फक्त हिंदू आहे. त्यामुळे त्यांनी धर्मांतर कराव. शरद पवारांनी मुस्लिम समाजामध्ये जावो. त्यांनी केलेले हे धर्मांतर आम्हाला चालेल, असे देखील नितेश राणे म्हणाले.
भाजपाला राजकारणासाठी औरंगजेब हवा आहे, संजय राऊत यांची जोरदार टीका
निलेश राणे यांनी केल्या या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्या म्हणाल्या की, आपल्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीबद्दल असे बोलणे हे लज्जास्पद आहे. त्यांच्या वागण्यातून त्यांची संस्कृती दिसते.