Sharad Pawar । मागील काही दिवसांपासून राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावमध्ये आयोजित सभेत सरकार आणि भाजपवर (BJP) कडाडून टीका केली. “ज्यांनी मागील ९ वर्षात काहीच केले नाही ते आता तुम्हाला लाठ्या मारत आहेत. मतदान करताना हे लक्षात ठेवा,” असा सल्ला त्यांनी जनतेला दिला. (Latest Marathi News)
शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. “जेव्हा आदिवासी लोकांवर गोळीबार करण्यात आला तेव्हा तुम्हाला हे सूचलं नाही का? तुम्ही प्राण घेतलेले आहेत तुम्ही तर खुनी आहात. ११४ लोकांचा जीव घेतला आहे आणि तुम्ही लोकांवर ज्ञान शिकवणार?”, असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.
तसेच त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये पेट्रोल टाकणाऱ्यांवर कारवाई करावी. मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) थोडा वेळ लागला तरी चालेल पण हे आरक्षण कायमस्वरुपी पाहिजे, असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, संजय शिरसाट यांच्या गंभीर आरोपांनंतर शरद पवार कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Havaman Andaj । आनंदाची बातमी! पुन्हा मान्सून सक्रीय होणार; जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज