Sharad Pawar । शरद पवार यांना सर्वात मोठा धक्का! गटातील नेत्यावर पोलिसांत ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Sharad Pawar

Sharad Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांच्यावर अ‍ॅट्रोसिटीच्या (Atrocity) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामधील सर्वात मोठी बाब म्हणजे फिर्याद तरुणावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघांवर क्रॉस एफआयआर दाखल केल्याची माहिती मिळत आहे. (Politics News)

Chandrakant Patil । धक्कादायक! चंद्रकांत पाटलांच्या ताफ्यासमोर तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न, नेमकं प्रकरण काय?

मेहबूब शेख हे आमदार निवासमधील खोली क्रमांक ४०६ मध्ये असताना त्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. (27 डिसेंबर) रात्री महेबूब शेख हे आमदार निवास येथे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या रुमवर मुक्कामी होते. यावेळीएक एक तरुण मद्यधुंद अवस्थेत त्या ठिकाणी आला आणि शेख यांच्याकडे मुक्कामाचा हट्ट करू लागला. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ranbir Kapoor । मोठी बातमी! अभिनेता रणबीर कपूरविरुद्ध तक्रार दाखल, नेमकं कारण काय?

यानंतर मेहबूब शेख यांनी शिवीगाळ करून आपल्याला मारहाण केल्याच्या आरोप तरुणाने केला. त्याचबरोबर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार देखील फिर्यादीने केली हा. वाद मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असून आता याप्रकरणी पोलिसांकडून काय कारवाई केली जाते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Ajit Pawar । पुन्हा दादा विरुद्ध दादा संघर्ष? कार्यकर्त्यांना दिला चंद्रकांत पाटलांनी न्यायालयात जाण्याचा सल्ला

Spread the love