Sharad Pawar । शरद पवारांची मोठी खेळी, भाजपला धक्का

Sharad Pawar

Sharad Pawar । निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दररोज महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते अतुल देशमुख यांनी भाजपच्या ध्येय धोरणांवर नाराजी व्यक्त करत दोन दिवसापूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. अतुल देशमुख यांच्यावर भाजपने शिरूर लोकसभेच्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाची समन्वयक म्हणून जबाबदारी दिली होती. मात्र त्यांच्या राजीनाम्याने भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.

Nilesh Lanke । निलेश लंकेंनी खिशातून पैसे काढले अन् राजकीय वर्तुळात उडाली खळबळ, ‘त्या’ वक्तव्याची रंगली सगळीकडे चर्चा

या सर्व घडामोडी घडत असतानाच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. अतुल देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला निघाले आहेत. शरद पवारांची भेट घेऊन अतुल देशमुख हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

Pune News । पुण्यातील MPSC तरुणीच्या मृत्यू प्रकरणाचे अखेर रहस्य उलगडले; धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती

एकीकडे अतुल देशमुख हे शरद पवारांच्या भेटीला निघाले आहे तर दुसरीकडे अतुल देशमुख यांची भाजपकडून मनधरणी सुरूच आहे. मागच्या दोन दिवसापूर्वी अतुल देशमुख यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे आणि आपण भाजपमधून बाहेर पडत असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे त्यामुळे भाजपसाठी अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात हा मोठा धक्का मानला जात आहे.

Jayant Patil । “घासूनपुसून काम करा, कुणाच्या घरी चहा…”, जयंत पाटलांचा पदाधिकाऱ्यांना दम

अतुल देशमुख यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना ‘ये ट्रेलर है पिच्चर अभी भी बाकी है’ असं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. जर अतुल देशमुख यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तर याचा मोठा फायदा अमोल कोल्हे यांना होणार आहे.

Nana Patole । नाना पटोलेंच्या कार अपघातप्रकरणी धक्कादायक बातमी समोर

Spread the love