
राज्यात लवकरच राजकीय भूकंप येणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) भाजप सोबत जाणार आहेत. अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांचे एक वक्तव्य प्रचंड चर्चेत आहे. ” आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. तव्यावर असणारी भाकरी सतत फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपून जाते. त्यामुळे भाकरी फिरवायला उशीर करून चालणार नाही.” असे शरद पवार म्हणाले आहेत.
मुंबई (Mumbai) येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या युवक मंथन कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केले आहे. ( NCP Youth Wing) त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हे वक्तव्य फक्त ‘वक्तव्य’ नसून महाविकास आघाडीसाठी ‘इशारा’ आहे का ? अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. अजित पवारांची मुख्यमंत्री बनण्याची दांडगी इच्छा आणि शरद पवारांच्या खेळी अवघ्या महाराष्ट्राला (Maharashtra) माहीत आहेत.
Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकचे ब्रेक फेल, 12 वाहनांची धडक; ६ जण जखमी
त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा आपली चाल खेळून राज्यात राजकीय भूकंप आणणार का ? अशी शक्यता निर्माण झाली आहे. काही व्यक्तिंना समाजात पद असो किंवा नसो मात्र त्यांना कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. त्या सन्मानासाठी तुम्ही पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं देखील यावेळी शरद पवार यांनी म्हंटले.