Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! उमेदवारीवरुन धुसफूस थांबवण्यासाठी शरद पवार रिंगणात, पदाधिकाऱ्यांसह बंद दाराआड चर्चा सुरु

Sharad Pawar

Sharad Pawar । राज्याचे राजकारण सध्या चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या (Loksabha) पार्श्वभूमीवर राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात घेताना दिसत आहे. पण काही नेते पक्षाने तिकीट नाकारल्याने पक्षांतर करत आहेत. महाविकास आघाडीतदेखील (Mahavikas Aghadi) उमेदवारीवरुन धुसफूस सुरु आहे. त्यासाठी आता ज्येष्ठ नेते शरद पवार मैदानात उतरले आहेत. (Latest marathi news)

Prakash Ambedkar । राजकारणातून मोठी बातमी! प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का

रावेर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील श्रीराम पाटील (Sriram Patil) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यानंतर पक्षात धुसफूस सुरु आहे. नाराजीनाट्य दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील प्रयत्न केले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे आज शरद पवार जळगावमध्ये सकाळीच दाखल झाले आहेत.

Ajit Pawar । अजितदादांचा दिलदारपणा! अपघातग्रस्ताला पाहताच गाडी थांबवली आणि…

दरम्यान शरद पवार यांच्यासोबत सुरू असणाऱ्या या बैठकीत रावेर लोकसभेचे उमेदवार श्रीराम पाटील हे देखील उपस्थित आहे. पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार यांची बंद वार चर्चा सुरू अजूनही त्यांच्यात नेमकी काय चर्चा सुरू हे समजू शकलेलं नाही. कार्यकर्त्यांची नाराजी संदर्भात महत्त्वपूर्ण घडामोडींबाबत शरद पवार यांची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! अगदी जवळचा आणि ज्येष्ठ नेता सोडणार साथ?

Spread the love