Sharad Pawar । माढा : देशभरात सध्या निवडणुकीची (Loksabha election) रणधुमाळी सुरु आहे. ठिकठिकाणी राजकीय नेतेमंडळी प्रचारसभा घेताना दिसत आहेत. अनेक नेते पक्षाने उमेदवारी नाकारल्याने दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. नुकतीच खासदार शरद पवार यांनी घेतलेल्या एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केला.
Baramati Loksabha । बारामतीत हाय व्होल्टेज लढत वेगळ्या वळणावर? दोन्ही पवार एकाच गाडीवर
आज माढा येथे शरद पवारांची सभा पार पडली. यावेळी या सभेत उपस्थितांना संबोधित करताना शरद पवारांनी मोदींनी दिलेल्या गॅस, वीज, तरुणांना रोजगार याबाबत दिलेल्या आश्वासनांची ऑडिओ क्लिप (Narendra Modi Audio Clip) ऐकवली. तसेच ऑडिओ क्लिप ऐकवत दहा वर्षांत तुम्ही काय केलं? असा सवाल शरद पवार यांनी मोदींना विचारला आहे.
Lok Sabha Election 2024 । “अमरावतीत कधीही हिंदू- मुस्लिम दंगल घडू शकते”, बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
पुढे शरद पवार म्हणाले की, “मी अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. पण या सगळ्यांनी देशाचा विचार केला पण मोदी लोकांमध्ये संघर्ष कसा वाढेल याची काळजी घेतात. हा देश हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन या सर्वांचा आहे. मोदींच्या मनात आलं तर त्यांनी लगेच कांद्याची निर्यात बंद केली. शिवाय त्यांनी साखर निर्यात बंद देखील केली. मोदी हे राज्य कोणासाठी चालवत आहेत? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला आहे.
Sanjay Raut । संजय राऊत यांचा धक्कादायक दावा, म्हणाले; “फडणवीसांना अटक होण्याची भीती असल्याने…”