Sharad Pawar । शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घालून पाया पडणार; बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Sharad Pawar

Sharad Pawar । राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात असले तरी त्यांची शरद पवार यांच्यावरील निष्ठा कायम आहे. झिरवाळ यांनी शरद पवार यांच्याबद्दल आपला आदर व्यक्त करताना, “माझ्या छातीत प्रभू राम दिसतात, आणि शरद पवार साहेबच दिसतात,” असं म्हटलं. त्यांनी याच संदर्भात मोठं विधान करतांना, “शरद पवार साहेबांसमोर जाऊन लोटांगण घालून पाया पडणार,” असं सांगितलं.

LPG Gas Cylinder Price Cut Today | खुशखबर! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात

झिरवाळ यांचे हे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पवार कुटुंब पुन्हा एकत्र येण्याचे आवाहन केल्यानंतर आलं. यावर झिरवाळ म्हणाले की, “सर्वांनाच वाटतंय की अजितदादा आणि शरद पवार साहेब एकत्र आले पाहिजे.” त्यांना पवार साहेबांची निष्ठा जपण्यासाठी त्यांचा निर्णय योग्य ठरला आहे, असं ते मानतात.

Valmik Karad case । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! वाल्मिक कराड याची प्रकृती बिघडली; ऑक्सिजन लावले

झिरवाळ यांनी राजकारणाच्या वाटचालीवर भाष्य करत सांगितलं की, त्यांना शरद पवार साहेबांपासून दूर जावे लागले, पण त्यांनी दिलेल्या निर्णयाच्या मूल्यांकनाचा अधिकार केवळ त्यांनाच आहे. तसेच, “माझं खातं नवीन आहे, पण मी जुना आहे,” असं स्पष्ट करत, त्यांनी सर्वांचे आशीर्वाद घेऊन कार्य करण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी झिरवाळ यांनी आपला मंत्रीपदाचा अनुभव सुद्धा शेअर करत सांगितलं की, “मी नशीबवान आहे, कारण मी उपाध्यक्षपद मिळवले.” असे ते म्हणाले.

Santosh Deshmukh Murder case । सर्वात मोठी बातमी! बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचे महत्त्वाचे आदेश

Spread the love