Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का! निकटवर्तीयाला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन नामंजूर

Sharad Pawar

Sharad Pawar । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राहुल शाह (Rahul Shah) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खोट्या सह्या केल्याप्रकरणी त्यांचा अकट अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे. श्री संत दामाजी महाविद्यालय या संस्थेची कोणतीही सभा न घेता सभा झाल्याचे बोगस कागदपत्रे तयार करून बनावट सह्या केल्याचा आरोप राहुल शाह यांच्यावर आहे. (Solapur News )

Breaking News । महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? पाहा नेमकं काय म्हणाले राज्यपाल?

याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यामध्ये (Mangalvedha Police Station) राहुल शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या गुन्ह्यात आपल्याला जामीन मिळावा यासाठी राहुल शाहच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे आपल्याला दिसत आहे.

Shubman Gill । किक्रेटसह शुबमन गिल 22 वर्षाच्या मॉडेलसोबत उतरणार नवीन व्यवसायात? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

माहितीनुसार श्री संत दामाजी हायस्कूल या संस्थेची कोणती सभा झालेली नव्हती तरी देखील सभा झाल्याचे कागदावर दाखवून एँड. रमेश जोशी यांच्या बनावट सह्या करण्यात आल्याचा आरोप जोशी यांच्याकडून राहुल शाह यांच्यावर करण्यात आला होता. या संस्थेचे एँड. रमेश जोशी 1978 सालपासून संस्थापक सभासद आहे. याच गुन्ह्यात जामीन मिळवण्यासाठी राहुल शहा यांनी न्यायालयात धाव घेतली होती मात्र तब्बल दोन महिन्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश श्री तोष्णीवाल यांनी हा अर्ज नामंजूर केल्याची माहिती मिळत आहे.

Maratha Reservation । मराठा समाजासाठी आज अत्यंत महत्वाचा दिवस, मराठा आरक्षण वैध की अवैध? आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी; संपूर्ण महाराष्ट्राचे लागले लक्ष

Spread the love