Manoj Jarange । मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जहरी टीका केली. यामुळे जरांगे पाटील यांना सत्ताधाऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले. या प्रकरणाची एसआयटीमार्फत (SIT) चौकशी होणार आहे. तसेच जरांगेच्या टीकेला राजकीय वास येतोय, असा दावा भाजपकडून (BJP) केला जात आहे. (Latest marathi news)
Manoj Jarange । मोठी बातमी! फडणवीसांवर आरोप करणे मनोज जरांगेंना पडणार महागात!
जरांगे पाटील शरद पवारांची (Sharad Pawar) स्क्रीप्ट बोलत असल्याचा आरोप भाजप आमदारांकडून केला जात असताना देवेंद्र फडणवीस यांनीही जरांगेंची स्क्रीप्ट शरद पवारांसारखीच असल्याचा आरोप केला आहे. यावर आता शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. “जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिलं नाही, असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले आहे.
Ajit Pawar । अर्थसंकल्पात अजित पवारांनी केल्या सर्वात मोठ्या घोषणा; वाचा एका क्लिकवर
“मनोज जरांगेंचं उपोषण सुरू झाल्यापासून त्यांना भेटायला पहिला मी गेलो. पण त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुमच्या मागणीचा आग्रह मी समजू शकतो. महाराष्ट्रचं सामाजिक ऐक्य टिकेल असं करा. तुमची मागणी समजू शकतो पण इतर समाजासाठीची कटुता योग्य दिसणार नाही, इतकंच माझं आणि त्यांचं संभाषण झालं आहे, त्यानंतर आजपर्यंत एका शब्दाने माझं आणि त्यांचं बोलणं नाही”, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले आहे.
Manoj Jarange । जरांगेंना शरद पवार आणि रोहित पवार यांच्याकडून मदत; धक्कादायक आरोप