ओडिशातील रेल्वे अपघातावर शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सर्व राजकीय पक्षांनीही…”

Sharad Pawar reacts on train accident in Odisha; Said, "Also all political parties..."

ओडिसामध्ये (Odisha) शुक्रवारी घडलेल्या भीषण अपघातामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेमुळे बऱ्याच लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही दुर्घटना कशी झाली त्याचं सत्य समोर आल आहे. मालगाडी आणि एक्सप्रेसगाडी यांच्यामध्ये धडक झाल्याची बातमी समोर आली आहे. पण यामुळे अपघातामध्ये तीन रेल्वे गाड्यांचा अपघात झाल्याचीही माहिती समोर आली आहे. हा भीषण अपघात अंगाचा थरकाप करणारा आहे. या भीषण अपघातातील दृश्य पाहून संपूर्ण देशामध्ये शोककळा पसरली आहे. आता या प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले…

याबाबत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताची चौकशी झाली पाहिजे. तशी मागणी देखील सर्व राजकीय पक्षांनीही केली आहे. चौकशीनंतर अपघाताचे नेमके खरे कारण काय हे समोर येईल.

अजित पवारांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली; म्हणाले…

दरम्यान, या अपघातामध्ये बचावलेल्या एका महिलेने तिची आपबीती सांगितली आहे. अपघात झाला त्यावेळी महिला कोरोमंडल एक्सप्रेसमध्येच वॉशरुमला गेली होती. त्यामुळे ती बचावली असल्याच स्वतः त्या महिलेने सांगितले आहे. मात्र ही महिला वॉशरुममधून बाहेर येताच तिला धक्का बसला कारण ट्रेन कलंडली होती. लोक एकमेकांवर पडलेले होते. चारही बाजूने प्रेतांचा खच होता. असं तिने सांगितले आहे.

गुंडाळलेला मृतदेहांचा ढीग, जखमींवर गॅलरीत उपचार सुरू; रेल्वे अपघातानंतरचे दृश्य पाहून बसेल धक्का

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *