Sharad Pawar । राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट (Sharad Pawar Group ) आणि अजित पवार गट (Ajit Pawar group) असे दोन गट पडले. यानंतर या दोन्ही गटांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर आपला दावा दाखवला. यानंतर हे प्रकरण थेट निवडणूक आयोगाकडे गेले. सध्या या प्रकरणाची निवडणूक आयोगासमोर (Election Commission) सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणी मध्ये शरद पवार गटाने जोरदार युक्तिवाद करत शरद पवारच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे महत्त्वाचा दावा केला आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 20 नोव्हेंबरला होणार आहे. मात्र आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं? ते जाणून घेऊया… (Politics News)
मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार गटाकडून आणि शरद पवार गटाकडून मोठ्या प्रमाणात शपथपत्रे सादर करण्यात आली होती. मात्र अजित पवार गटाने सादर केलेल्या शपथपत्रांवर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत.
Devendr Fadanvis । सुषमा अंधारेंनी ट्वीट केलेल्या व्हिडिओवर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
अजित पवार यांनी जवळपास 20 हजार शपथ पत्र दाखल केले. यामधील जवळपास 8 हजार पेक्षा जास्त शपथपत्र ही फसवी असल्याचे शरद पवार गटाच्या वकिलांनी म्हटले आहे. यापैकी अनेकांचा मृत्यू झालेला आहे. काही जण दुसऱ्या पक्षातील आहेत तर लहान मुलांच्या नावाने देखील शपथपत्रे दिली असल्याचा दावा शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.