Sharad Pawar । बारामती : निवडणूक आयोगाने अजित पवार (Ajit Pawar) यांचाच गट खरा राष्ट्रवादी पक्ष (NCP) असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयामुळे शरद पवार यांना खूप मोठा धक्का बसला आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar0 यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय देत अजित पवार यांच्या गटाला मूळ राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. (Latest marathi news)
Pune Accident । भीषण अपघात! राष्ट्रीय महामार्गावर तीन जणांचा होरपळून मृत्यू
यावर आता शरद पवार आक्रमक झाले असून त्यांनी बारामतीतून हल्ला केला आहे. “देशात असे पहिल्यांदा घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष आणि चिन्ह पण काढून घेतला. हा निर्णय कायद्याला धरून आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे आपण सुप्रीम कोर्टात गेलो आहोत त्याचा निकाल लवकरच येईल”, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
“चिन्हाची काळजी करायची गरज नसते. कारण मी १४ निवडणूक लढलो असून यामध्ये ५ वेळा निवडणूक चिन्ह वेगळं होत. चिन्ह काढून घेतलं की पक्ष संपला असं होत नाही. राजकारणात पक्ष उभे राहतात, काही पक्ष सोडून जातात. नवीन येतात, असं होतच असतं. एखादी व्यक्ती गेली म्हणजे संपूर्ण पक्ष गेला, असं नाही. आपण कायम सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
Attack on MLA । काँग्रेस आमदाराची फोडली कार, कार्यक्रमावेळी घडली धक्कादायक घटना