Site icon e लोकहित | Marathi News

Sharad Pawar । ब्रेकिंग! शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार? स्वतःच दिली मोठी माहिती

Sharad Pawar

Sharad Pawar । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची (Assembly Elections) रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. पवार यांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले असून, त्याबद्दलचे विचार त्यांनी एका प्रचारसभेत मांडले. “दीड वर्षांनंतर राज्यसभेत जायचं की नाही, याचा विचार मला करावा लागेल,” असे ते म्हणाले.

Uddhav Thackeray । सर्वात मोठी बातमी! ऐन विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी घेतला धक्कादायक निर्णय

शरद पवार यांनी 1967 पासून महाराष्ट्रात राजकारण करत आहे. “55 वर्षांपूर्वी मी महाराष्ट्रात काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी जे मतदार होते, ते अजूनही माझ्या आसपास आहेत,” असे पवार म्हणाले. याबरोबरच, त्यांनी यावेळी आपल्या राजकारणातील भविष्याबद्दलही सांगितले. “30 वर्षांपूर्वी मी लोकसभेला उभा राहणार नाही, असं ठरवलं होतं. आता पुढच्या 30 वर्षांची योजना करण्याची आवश्यकता आहे,” असं शरद पवार म्हणाले.

Ajit Pawar । अजित पवारांचं मोठ यश: अणुशक्ती नगर आणि दिंडोरीतील शिवसेना-शिंदे गटातील उमेदवारांनी घेतली माघार

राजकीय निवृत्ती घेण्याचे संकेत देताना पवार म्हणाले, “मी आणखी निवडणुका लढवणार नाही. लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार नाही, त्याचप्रमाणे राज्यसभेची सदस्यता देखील पुढे ठेवावी का याच्यावर विचार करावा लागेल.” तसेच, “किती निवडणुका लढायच्या? मी 14 निवडणुका लढवल्या आहेत आणि प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. आता थांबण्याची वेळ आली आहे आणि नव नेतृत्व उभं करण्याची आवश्यकता आहे,” असेही शरद पवार यांनी सांगितले.

Indapur News । इंदापुरच्या राजकारणात मोठी खळबळ! शरद पवारांना बसला मोठा धक्का

Spread the love
Exit mobile version