Sharad Pawar । राज्य विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला आलेल्या पराभवावर शरद पवार यांनी खुलासा केला आहे. 56 जागांवरून 10 जागांवर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीदरम्यान पवार यांनी स्वीकारले की, पक्षाला लोकसभेतील घवघवीत यशामुळे विधानसभा निवडणुकीसाठी गाफील राहण्याचा धोका होता. त्यांनी विरोधकांच्या यशामागे संघाच्या प्रचाराला महत्त्व दिलं आणि म्हणाले की, संघाच्या कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन हिंदुत्वाचा प्रचार केला, ज्याचा परिणाम निवडणुकीतील निकालावर दिसला.
पवारांनी यावेळी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत सांगितलं की, लोकसभा निवडणुकीतील यशामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीला दुर्लक्ष केलं. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी मोठे बदल करण्यात येणार असल्याची माहिती दिली. महिलांना 50 टक्के आणि खुल्या गटातील उमेदवारांना 60 टक्के जागा दिल्या जातील, असं पवारांनी सांगितलं.
Pune News । पुण्यातील रिक्षाचालकांसाठी नवा नियम, …नाहीतर परवाना होईल रद्द!
राजकीय वर्तुळात अजित पवार यांच्या पडद्यामागील हालचालींविषयी चर्चा सुरू असून, काही खासदारांना आपल्या पक्षात आणण्यासाठी सुनील तटकरे यांनी प्रयत्न केले होते. तथापि, या ऑफरला त्या खासदारांनी नकार दिला आहे.