Sharad Pawar | लोकसभेच्या (Maharashtra Parliament Winter Session) खासदारांच्या निलंबनाचं (MP Suspension) सत्र अजूनही सुरु असल्याचं दिसत आहे. कालच्या निलंबनावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं मात्र अस असलं तरी आजही आणखी 49 खासदारांचं निलंबन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आले आहे. दोन्ही सभागृहांमध्ये सुरु असलेल्या गदारोळामुळे खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.
माहितीनुसार, आज एकूण 49 खासदारांचं निलंबन करण्यात आलं असून यामध्ये सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. यासह निलंबित खासदारांची संख्या 141 वर पोहोचली आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच संतापल्याचे पाहायला मिळत आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “सभागृहात सुरु असल्येल्या गंभीर गोष्टी याआधी झालेल्या नाहीत. विरोधकांनी फक्त हे लोक कोण होते, यामध्ये कोणाचा हात आहे. याची माहिती गृहमंत्र्यांनी द्यावी अशी मागणी केली आहे. मात्र ती माहिती सभागृहात न देण्याची भूमिता घेतली गेली. याविषयी सभागृहाच्या बाहेर बोलले जात आहे मात्र ज्याठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणी ही माहिती देणार नाही अशा प्रकारचं वर्तन सत्ताधारी पक्षाचं आहे. मात्र यात बदल करावा आणि माहिती द्यावी अशी मागणी केली आणि त्यामुळेच खासदारांनी बडतर्फ केलं. अशा कारणांसाठी अशी कारवाई याआधी झालेली नाही,” अशी जोरदार टीका शरद पवारांनी केली आहे.
Crime । धक्कादायक! एकाच घरातील ६ जणांची क्रूर हत्या, नेमकं कारण आलं समोर