Sharad Pawar । ब्रेकिंग न्यूज! शरद पवार गट लोकसभेच्या किती जागा लढवणार? जयंत पाटलांनी माध्यमांसमोर दिली मोठी माहिती

Sharad Pawar Grup

Sharad Pawar । राज्याच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. या सर्व घडामोडीनंतर आता सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीला लागले आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे लोकसभेचे जागावाटप जवळपास ठरले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट सर्वात जास्त जागा लढवणार आहे तर शरद पवार (Sharad Pawar ) गटाला देखील अधिक जागा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. (Politics News)

Accident News । सर्वात भयानक अपघात! शॉर्टकट मारायला गेले भरधाव कार दुचाकीला धडकली, पती-पत्नी हवेत उडाले

शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबत माहिती दिली आहे. जयंत पाटील यांनी त्यांचा गट किती जागा लढवणार याचा आकडा सांगून टाकला आहे. त्याचबरोबर काही मतदारसंघांची नावे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहेत. माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

Tecno Spark Go 2024 । 8,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत iPhone सारखा दिसणारा फोन मिळतोय, फीचर्सही आहेत दमदार; जाणून घ्या अधिक

शरद पवार गट लोकसभेच्या 14 ते 15 जागा लढवणार आहे. यामध्ये बारामती, भंडारा, सातारा, रायगड, शिरूर, अमरावती, रावेर, दिंडोरी या मतदार संघाचा समावेश असल्याची माहिती जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर काही मतदारसंघात आपण उमेदवार बदलणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे.

Baramati Lok Sabha । सर्वात मोठी बातमी! बारामतीतून सुनेत्रा पवारांना निवडून आणण्यासाठी भाजप लावणार ताकद

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांच्या गटाच्या जागा जाहीर केल्या आहेत. यावर देखील जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे. त्यांचा वेगळा पक्ष झालेला आहे. त्यांना काही जागा लढवव्या लागतील, काही मतदारसंघात लढवतील ते पण खरच ते लढणार की लढवल्यासारखं दाखवणार हे बघायचय, असा टोला देखील यावेळी जयंत पाटील यांनी लगावला आहे.

Ajit Pawar । बिग ब्रेकिंग! अखेर मराठा समाजाच्या विरोधानंतर अजित पवार यांचा दौरा रद्द, नेमकं कारण काय?

Spread the love