Sharad Pawar । राज्यात विधानसभा निवडणुकांची (Assembly elections) धुमधडाक्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तीव्र टीका केली आहे. पडळकरांनी पवारांवर जातीयवाद आणि सरंजामशाहीसंबंधी गंभीर आरोप केले आहेत, ज्यामुळे राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Bjp । ब्रेकिंग! भाजपची विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी, राज्याबाहेरील नेत्यांची फौज मैदानात
गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांना ‘जातीयवादाचा कॅन्सर’ असा टाकून राज्याच्या पुरोगामी चेहऱ्यावर गदा आणल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “शरद पवारांनी महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाच्या कॅन्सरने ग्रासले आहे. ५०-६० वर्षे त्यांनी राज्यावर आपला वर्चस्व गाजविला, आणि राज्याचे पुरोगामी चेहरा त्यांनी बिघडविला आहे.”
गोपीचंद पडळकर यांनी एक्सवर यासंदर्भात एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. सध्या तो व्हिडीओ खूप चर्चेत आहे. व्हिडीओ शेअर करत त्यांनी म्हंटले आहे की, “शरदचंद्र पवार म्हणतात, “सत्ता हातात आल्यावर महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल.” पण पवार साहेब, तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला. ५०-६० वर्ष महाराष्ट्र लुटणं, शिवरायांच्या तेजाची झळाळी हरवणं, हेच तुमचं वारसाहक्क आहे. महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास थांबवून पुन्हा सरंजामी राजवट आणायची आहे का? दलित-ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का?”
पाहा व्हिडीओ
@PawarSpeaks म्हणतात, "सत्ता हातात आल्यावर महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल." पण पवार साहेब, तुमच्यामुळेच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर झाला. ५०-६० वर्ष महाराष्ट्र लुटणं, शिवरायांच्या तेजाची झळाळी हरवणं, हेच तुमचं वारसाहक्क आहे. महाराष्ट्राचा सर्वसमावेशक… pic.twitter.com/5iLER6SX2E
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) September 16, 2024