Sharad Pawar । राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) गट आणि अजित पवार (Ajit Pawar) गट असे दोन गट पडले. यानंतर दोन्ही गटांनी पक्षावर आणि चिन्हावर आपला दावा केला. यानंतर हे प्रकरण थेट निवडणूक आयोगाकडे गेले. दरम्यान, आज केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये (Central Election Commission) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी पार पडत आहे. या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगाच्या कार्यालयात हजर झाले आहेत. (Politics News)
शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) देखील सुनावणीसाठी हजर झाले आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) हे दोन नेते निवडणूक आयोगामध्ये दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून प्रतिज्ञा सादर करण्यात आले आहेत. आता पुन्हा एकदा सुनावणी पार पडत आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोगाकडून मोठी काही घोषणा होते काही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Ajit Pawar । दिवाळी पाडव्याला अजित पवार गोविंद बागेत उपस्थित राहणार का? समोर आली मोठी माहिती
अजित पवार गटाकडून याआधी युक्तिवाद करण्यात आला होता त्यानंतर अजित पवार गटाच्या वकिलांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ वाढवून मागितला. त्यामुळे आता निवडणूक आयोग युक्तिवादासाठी वेळ वाढवून देणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
Eknath Khadse । एकनाथ खडसे अजूनही हॉस्पिटलमध्येच दाखल, नेमकी कशी आहे तब्येत? समोर आली मोठी अपडेट