
Sharad Pawar । मागच्या काही दिवसापासून शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे अशी वक्तव्य अनेक जणांनी केली आहेत. मात्र याकडे लक्ष न देता शरद पवार यांनी आपलं काम चालूच ठेवलं आहे. त्यांनी मागच्या काही दिवसापूर्वी मी निवृत्त होणार नसल्याचं देखील स्पष्ट केलं होत. मात्र तरीदेखील अनेकजण शरद पवारांना निवृत्तीचा सल्ला देतात. दरम्यान आता शरद पवार यांनी निवृत्ती घ्यायला हवी असा सल्ला त्यांचे जिवलग मित्र आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (सीआयआय) मालक सायरस पूनावाला यांनी दिला आहे. (Serum Institute of India)
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सायरस पूनावाला यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या वक्तव्याच्या सगळीकडे जोरदार चर्चा रंगल्या आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सायरस पूनावाला यांनी शरद पवारांचं कौतुक केलं. मात्र त्याचबरोबर त्यांनी शरद पवारांना निवृत्ती घेण्याचा देखील सल्ला दिला. त्याचबरोबर शरद पवार यांनी दोन वेळा पंतप्रधान होण्याची संधी घालवली अशी खंतही यावेळी त्यांनी बोलून दाखवली.
शरद पवार हे फार हुशार असून, जनतेची सेवा करु शकले असते. मात्र आता त्यांचं वय झालं आहे. त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी,” असं सायरस पूनावाला म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याच्या राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. आता या वक्तव्यावर शरद पवार काही प्रतिक्रिया देखील का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.