Sharad Pawar । पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) भाजप (Bjp) कुठेही सत्तेतून बाहेर पडेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गुरुवारी केला. ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यापैकी फक्त मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. शरद पवार यांनी सोलापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “जिथे भाजपची सत्ता असेल, तेथे निवडणुकीनंतर तुम्हाला बिगरभाजपा मुख्यमंत्री होताना दिसतील.” मध्य प्रदेश व्यतिरिक्त छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी चुकीच्या वृत्तीने प्रचार करत आहेत, असेही पवार म्हणाले. “त्यांच्या पक्षाची आत्मविश्वासाची पातळी घसरली आहे आणि लोक यापुढे त्यांच्या खोट्या आश्वासनांना बळी पडणार नाहीत.” असं देखील शरद पवार म्हणाले आहेत.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का?
शरद पवार आणि त्यांचे पुतणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनानंतर पुन्हा एकत्र येणार असल्याच्या अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, अमळनेरमधील काही लोकांची मी भेट घेतली, त्यांनी मला सांगितले. अनिल पाटील (जे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील आहेत) पुढील निवडणुकीत निवडून येणार नाहीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) लवकरच जागावाटपावर चर्चा करतील, असे ते म्हणाले.
त्याचबरोबर यावेळी बोलताना शरद पवार यांनी मराठा आरक्षणावर देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, :मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य आणि केंद्र सरकारला असून त्यांनी हा प्रश्न लवकर सोडवावा.”
Gmail Alert । सावधान! तुमचेही पुढच्या महिन्यात बंद होईल Gmail अकाऊंट, नेमकं कारण काय?