Sharad Pawar । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत बंडखोरी करत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. आता अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर खुद्द शरद पवार यांनी एक मोठा खुलासा केला आहे. (Latest Marathi News)
Success story । इंदापूरच्या पट्ठ्याने करून दाखवले! 10 गुंठ्यातील वांग्याने बनला लाखोंचा धनी
शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. यामध्ये त्यांनी मोठा खुलासा केला आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, अजित पवार यांना भाजप सोबत जाण्यासाठी मी परवानगी दिली नाही असं म्हणाले आहेत. तर अजित पवार यांनी तपास यंत्रणेंच्या भीतीमुळे भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला आहे.
LPG Cylinder New Price । केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय! आता 600 रुपयांना मिळणार एलपीजी सिलेंडर
ज्यावेळी अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत देखील शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केलं आहे . याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले माझ्याकडे ६ ते ७ सहकारी आले. सरकारला पाठिंबा न दिल्यास जेलमध्ये जावे लागेल त्यामुळे आमच्या समोर सध्या दोनच पर्याय आहेत. एक तर भाजप सोबत जाणे किंवा जेलमध्ये जाणं. असे शरद पवार यांनी सांगितले आहे. सध्या त्यांचे वक्तव्य सगळीकडे चर्चेत आहे.
Success story । केळीच्या पिकातून चमकले नशीब! ९ महिन्यात घेतले ९० लाखांचे भरघोस उत्पादन