Sharad Pawar । मुंबई : गौतमी पाटील हे कायम चर्चेत राहणारे नाव, तिच्या प्रत्येक कार्यक्रमाला गर्दी असते. तसाच तिच्या प्रत्येक कार्यक्रमात राडा देखील ठरलेला असतो. त्यामुळे तिचा प्रत्येक कार्यक्रम हा पोलीस बंदोबस्तात पार पडतो. अनेकवेळा हुल्लडबाजांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागतो. गौतमी पाटील आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
Mia Khalifa । पॅलेस्टाईनला पाठिंबा देणे मिया खलिफाला पडले महागात! नोकरीवरुन केली हकालपट्टी
तिचं आता चर्चेत येण्याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळी कार्यक्रमाला शरद पवार यांनीदेखील हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महिला आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल भाष्य केले आहे. महिला चांगल्या प्रकारे संघटनात्मक काम करतात, हे सर्वांनी दाखवून दिले आहे. मी संरक्षण मंत्री असताना महिलांना लष्करात काम करायला मिळावं, हा निर्णय घेतला. परंतु आज देशात महिलांची धिंड काढली जात आहे.
“आता सरकार खासगी कंपन्यांना जिल्हा परिषद शाळा चालवण्यास परवानगी देणार आहेत. यातून त्यांनी शाळेचा विकास करावा. ज्या कंपनीने शाळा दत्तक घेतली असेल त्या शाळेला कोणतंही नाव घेण्याचा नाव देण्याचा अधिकार आहे. नाशिकच्या एका मद्य बनवणाऱ्या कंपनीने एक शाळा दत्तक घेतली आहे. तेथील शाळेत त्यांनी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम घेतला होता,” अशी जहरी टीका शरद पवार यांनी केली आहे.
Shivsena । शिवसेना पक्षाचं नाव, चिन्ह ठाकरेंना मिळणार का? आज होणार महत्त्वपूर्ण सुनावणी