Sharad Pawar । नवीन वर्षात 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलला प्राण प्रतिष्ठाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गजांना आमंत्रित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशिवाय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन आणि इतर अनेक बड्या विरोधी नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
याशिवाय सुमारे आठ हजार व्हीआयपी पाहुणे या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये चार हजार संतांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आता याच राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून शरद पवारांनी (Sharad Pawar ।) मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
Pune Fire News । सर्वात मोठी बातमी! पुण्यामध्ये एकाच वेळी 10 सिलेंडरचा झाला स्फोट
‘मला राम मंदिर झाल्याचा आनंद आहे. मात्र, मला सोहळ्यासाठी निमंत्रण मिळालं नसल्याची माहिती शरद पवारांनी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. (sharad pawar said i didnt get an invitation to the ram mandir invitation)