Site icon e लोकहित | Marathi News

Sharad Pawar । पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर शरद पवारांनी जुनी खेळी खेळली; नेमकं काय घडतय?

Sharad Pawar

Sharad Pawar । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे राजकारणही तापले आहे. अलीकडेच राजकारणाचे चाणक्य म्हणल्या जाणाऱ्या शरद पवारांना निवडणूक आयोगाने अजित पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस ही खरी राष्ट्रवादी काँग्रेस घोषित केल्यानंतर मोठा धक्का बसला. आता शरद पवार काही मोठे पाऊल उचलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शरद पवार यांची पुढची राजकीय भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच शरद पवार त्यांची जुनी खेळी खेळताना दिसत आहेत.

Kamal Nath News Live । काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बसणार! बडा नेता मुलासह अनेक आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार?

लोकांच्या भेटी घेणे त्यांच्यासोबत संवाद साधने ही शरद पवार यांची जुनी राजकीय निती आहे. लोकांचा पाठिंबा हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. असल्याचं शरद पवार म्हणतात. आता देखील पुन्हा एकदा शरद पवार ही जुनी राजकीय आखताना दिसत आहेत. पक्ष आणि चिन्ह हातून गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा बारामतीमध्ये आहेत. ते जुन्या सहकाऱ्यांच्या भेटी घेत असल्याचे समाजत आहे.

Amravati Accident News । अतिशय भीषण अपघात! क्रिकेट मॅच खेळायला निघालेल्या तरुणांच्या मिनी बसचा भीषण अपघात; ४ जण जागीच ठार तर १० जण गंभीर

काय आहेत राजकीय समीकरणे?

निवडणूक आयोगाकडून चिन्ह मिळाले, पण उशिरा मिळाले, तर ते मतदारांपर्यंत पोहोचवण्यात अडचण येईल, तर राष्ट्रवादीचे घड्याळ आणि नाव अजित पवार यांच्याकडेच राहील. यातही शरद गटाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची ही अडचण पाहता काँग्रेसने दोन ऑफर दिल्याचे सूत्रांकडून समजते. शरद पवार गटाने एकतर काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावर आपला उमेदवार उभा करावा. किंवा राष्ट्रवादी पवार गटाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manisha Kadane । धक्कादायक बातमी! लेखी परीक्षा पास फक्त ग्राऊंड राहिलेलं, पण घडलं वेगळंच…

Spread the love
Exit mobile version