राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. शरद पवारांचे आत्मचरित्र ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली. यानंतर सभागृहात कार्यकर्त्यांनी गोंधळ सुरू केला. शरद पवार यांनी हा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादीच्या ( NCP) सर्व नेत्यांनी विनंती केली. (NCP President Sharad Pawar announced about retirement )
खुशखबर! शेतकऱ्यांना आता सवलतीच्या दरात ड्रोन मिळणार; कृषिमंत्र्यांनी केली घोषणा
एवढंच नाही तर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड व इतर बड्या नेत्यांनी शरद पवारांना भावनिक आवाहन देखील केले. यावेळी शरद पवार विचार करण्यासाठी वेळ मागून विश्रांतीसाठी सभागृहातून निघून गेले होते. मात्र तरीदेखील कार्यकर्ते शांत बसले नाहीत. त्यांनी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ बाहेर धरणे धरले आहे. याठिकाणी अजित पवार ( Ajit Pawar) यांनी देखील ” पवार साहेब असा निर्णय घेतील, असं कुणालाही वाटलं न्हवतं.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Gautami Patil । गौतमी पाटीलला चाहत्यांकडून खास गिफ्ट; सोशल मीडियावरची पोस्ट चर्चेत!
दरम्यान शरद पवारांनी अजित पवारांकडे कार्यकर्ते व नेत्यांसाठी निरोप दिला आहे. तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर मला विचार करायला दोन ते तीन दिवस वेळ द्या. असं शरद पवारांनी सांगितले आहे. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या घरी जावं, राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करुन त्यावर निर्णय घेतो, असं सुद्धा शरद पवारांनी सांगितले आहे. तसेच राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत. अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
Rishabh Pant । मोठी बातमी! ऋषभ पंत याच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर