Sharad Pawar । राष्ट्रवादीबाबत निवडणूक आयोगाने मागच्या काही दिवसापूर्वी ऐतिहासिक निर्णय दिला. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना दिले. यांनतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्याकडे गेल्यानंतर शरद पवार काय भूमिका घेणार? काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Pune Crime । शरद मोहोळच्या पत्नीला धमकवलेल्या आरोपीने ससून रुग्णालयातुन ठोकली धूम!
निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र शरद पवार यांनी याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र आता शरद पवार याबाबत बोलले आहेत. सहा दिवसांनी शरद पवार यांनी याबाबत जाहीर पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काय म्हणाले शरद पवार?
याबाबत बोलताना पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले, “निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा आश्चर्यकारक आहे. ज्यांनी पक्ष काढला त्यांच्या हातातून पक्ष काढून दुसऱ्याला देणे, असा प्रकार य़ा देशामध्ये या आधी कधी झाला नव्हता. ते सुद्धा निवडणूक आयोगाने करुन दाखवले.मात्र याबाबत माझी खात्री आहे की, लोक या गोष्टीला समर्थन देणार नाहीत. आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ” असे शरद पवार म्हणाले आहे.