Sharad Pawar । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Elections) वारे वाहत आहे. यंदा बारामती लोकसभा मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे. त्यामुळे सर्वांचे या मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. दरम्यान शरद पवार यांनी त्यांचा नातू रोहित पवार यांच्यवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रभारीपदी रोहित पवार यांची नियुक्ती केली आहे.
Savitri Jindal । देशातील सर्वात श्रीमंत महिलेने सोडली काँग्रेसची सोडली, भाजपमध्ये करणार प्रवेश?
राष्ट्रवादीकडून शरदचंद्र पवार या सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित आहे. या मतदारसंघातून सुप्रिया सुळे या खासदार आहेत. अजित पवार गटाचा राष्ट्रवादीचा उमेदवार महायुतीकडून रिंगणात उतरवला जाणार असून, शक्यतो अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार असू शकतात, असे मानले जात आहे.
Bacchu Kadu । “…त्यामुळे मी गुवाहाटीला गेलो”, बच्चू कडू यांनी केला सर्वात मोठा गौप्यस्फोट
रोहित परवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते बारमती ॲग्री लिमिटेडचे सीईओ देखील आहेत. सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ त्यांनी प्रचार सुरू केला आहे. गुरुवारी पक्षाचे कार्यकर्ते व अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते सहभागी झाले होते. त्याचबरोबर ते अजित पवार यांच्या गट राष्ट्रवादीवरही हल्लाबोल करणारे आहेत, ज्यांनी गेल्या वर्षी काकांविरुद्ध बंडखोरी केली होती, त्यानंतर पक्षात फूट पडली होती.
Congress । लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का