Sharad Pawar । झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य!

Sharad Pawar

Sharad Pawar । केंद्र सरकारने (Central Govt) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी 55 सशस्त्र सीआरपीएफ जवान तैनात करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी तयारी करत असताना शरद पवार राज्यभर दौऱ्यावर जाणार आहेत, त्यामध्ये सुरक्षेची आवश्यकता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (Politics News )

Badlapur News । बदलापुर अत्याचार प्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

शरद पवार यांनी या निर्णयावर पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना म्हटले की, “मला या सुरक्षा व्यवस्थेची माहिती नाही. गृहखात्याचे अधिकारी आले आणि सांगितले की, झेड प्लस सुरक्षा मिळणाऱ्या तीन लोकांमध्ये मी, मोहन भागवत आणि अमित शाह यांचा समावेश आहे. निवडणुका नजिक आल्यामुळे सुरक्षा देण्यात आलेली असावी. माझ्या दौऱ्याची माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते.” त्यांनी या निर्णयावर गृहमंत्रालयातील संबंधित व्यक्तीशी संवाद साधून पुढील निर्णय घेण्याची तयारी दर्शवली आहे.

Daund News । दौंड तालुक्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; गावात संतापाची लाट

याच मुद्द्यावर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी सोशल मीडियावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, “शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे, 55 सीआरपीएफ जवान त्यांना सुरक्षा देतील. याचा अर्थ त्यांना कोणापासून धोका आहे हे समजत नाही. 50 वर्षे देशभर फक्त सत्तेवर बसले तरी झेड प्लस सुरक्षा मिळते का?” निलेश राणे यांच्या या टीकेमुळे चर्चा सुरू झाली आहे.

Badlapur Atrocities Case । बदलापूर अत्याचार प्रकरणी मोठी अपडेट! आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत

Spread the love