
Sharad Pawar । मराठा आरक्षण विधेयक मंगळवारी महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर झाले असून ते आता विधान परिषदेत मांडले जाणार आहे. राज्यातील मराठा समाजाच्या लोकांना सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. ओबीसी आरक्षणाशी छेडछाड न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग काढू, असे आश्वासन शिंदे सरकारने दिले होते आणि ते पूर्ण केले आहे. दरम्यान शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात सूचक विधान केले आहे.
Raj Thackeray । मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “गेल्या वेळेप्रमाणे जर कोर्टात…”
याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, ” काल जो निर्णय झाला याबाबत माझ्या मनात शंका आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला तर मला आनंदच आहे पण काल जे विधेयक संमत झाले हे याआधी देखील पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारने संमत करत मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र ते आरक्षण उच्च न्यायालयामध्ये टिकलं नव्हतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेली आरक्षण देखील टिकलं नाही. अशी आठवण शरद पवारांनी करुन दिली आहे.
जर प्रश्न सुटत असतील तर विरोधासाठी विरोध नको या भूमिकेतून या विधेयकाला कोणीही विरोध केला नाही. म्हणूनच हे विधेयक एकमताने मंजूर झाले असल्याचं शरद पवार यांनी सांगितले. पत्रकार परिषद देत शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
Sharad Pawar । इंडिया आघाडीतील वादविवादावर शरद पवार यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य