Sharad Pawar । अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे. अनेक बड्या नेत्यांना यासाठी निमंत्रण मिळाले असून ते नेते अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. मात्र काही नेत्यांना अजूनही आमंत्रण मिळालेले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील आमंत्रण मिळाले नाही. स्वतः शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. शरद पवार आज जुन्नरच्या दौऱ्यावर असून जुन्नरमध्ये त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचा शेतकरी मेळावा संपन्न होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी आमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले आहे.
काय म्हणाले शरद पवार? (Sharad Pawar)
“अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, मला त्याचं आमंत्रण आलेलं नाही. मात्र आमंत्रण आले नसले तरी मी जाणार आहे. मात्र 22 जानेवारीला नाही जाणार मात्र नंतर नक्की जाईल. प्रभू श्रीराम हे सर्वांचे आहेत,” असे शरद पवार म्हणाले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.
Pune Crime News । ब्रेकिंग न्यूज! पुणे हादरलं, कात्रज चौक परिसरात डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या
घराणेशाहीवरुन मोदींवर केली टीका…
जुन्नरमध्ये कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी वेगेवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांनी मोदींवर देखील निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी घराणेशाहीच्या टीकेवरुन पंतप्रधान मोदींवर पलटवार केला. पंतप्रधान काल येऊन गेले. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले घराणेशाही आलीये, ती मोडीत काढायला हवी. आता घराणेशाही म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे.
Congress । मोठी बातमी! काँग्रेसला मोठा धक्का बसणार; मुंबईतील बडा नेता शिंदे गटात जाणार