Sharad Pawar । लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Sharad Pawar

Sharad Pawar । भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न (Bharat Ratna to LK Advani) देऊन सन्मानित करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (३ फेब्रुवारी) आनंद व्यक्त केला आहे. देशाच्या विकासात त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे, असे शरद पवार म्हणाले.

Ganpat Gaikwad Firing । आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा थरकाप उडवणारा गोळीबाराचा व्हिडीओ

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले की, ते आणि लालकृष्ण अडवाणी वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे पालन करतात, पण ते भाजपचे चांगले नेते तसेच एक चांगले खासदार आणि केंद्रीय मंत्री होते. लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येणार याचा आनंद असल्याचंही शरद पवारांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे. देशाच्या विकासात अडवाणींचे मोठे योगदान असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हंटले आहे.

Mahesh Gaikwad Health Update । शिंदे गटाचे महेश गायकवाड व्हेंटिलेटरवर; प्रकृती अतिशय चिंताजनक

पंतप्रधान मोदींनी अभिनंदन केले

आज लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर ट्विट केले आणि म्हटले की, ‘लालकृष्ण अडवाणी जी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Manoj Jarange Patil । मनोज जरांगे पाटील यांचं धक्कादायक विधान

Spread the love