
Sharad Pawar । अजित पवार यांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी केल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन गट पडले. यांनतर दोन्ही पवार कुटुंब एकमेकांवर आरोप करत आहेत. पवार कुटुंबियांमधील वाद हा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहे. अजित पवार यांच्यावर त्यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार यांनी देखील टीका करत विरोधी भूमिका घेतली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या आत्या आणि शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना सरोज पाटील म्हणाल्या, “निवडणुकीपर्यंत हे ढग आहे, निवडणूक संपली की हे ढग निघून जातील, असे स्पष्ट मत त्यांनी माध्यमांशी बोलताना मांडले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवार कुटुंबामध्ये फूट नाही. निवडणूक होईल, जे निवडून येतील ते येतील. निवडणुका झाल्यावर सर्व संपेल. असं देखील त्या म्हणाल्या आहेत.
Ajit Pawar । अजित पवार आणि पंकजा मुंडे मोठ्या अडचणीत सापडणार?
त्याचबरोबर पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ” आम्ही कधीच घरात राजकारण आणत नाही. शरद पवार नेहमी स्वत:च्या ताटापेक्षा बहिणीच्या ताटात काय आहे, हे पाहत आले. यामुळे पवार कुटुंबात काहीच होणार नाही. असं देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
Jayant Patil । जयंत पाटील यांचे निलेश लंकेंबाबत सर्वात मोठे वक्तव्य